महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Jitendra Awad : औरंगजेबाचा पुळका कोणालाही येत नाही! तुम्ही या दोन पुस्तकांवर बंदी आणणार का? -जितेंद्र आव्हाड - जितेंद्र आव्हाड

By

Published : Jan 3, 2023, 5:56 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ठाणे मागील काही दिवसांपासून शिवाजी महाराज औरंगजेब (Aurangzeb) या दोन्ही विषयांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढले आहे. यात सत्ताधारी विरोधकांच्या विरोधात आंदोलनासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले, तर विरोधक देखील अशाच प्रकारे आक्रमक झालेले दिसत आहेत. काल जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awad) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister Eknath Shinde) प्रत्युत्तर दिल्यावर, आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले असुन; त्यांनी 'मी दोन पानं पाठवत आहोत ती नीट वाचून घ्यावी', असं आव्हानच मुख्यमंत्र्यांना (Jitendra Awad replied on CM Eknath Shinde Statement) दिलं आहे. 'जी दोन पान आम्ही काढली आहेत, गोळवलकर आणि सावरकरांनी लिहिलेली आहेत. त्यातले दोन शब्द 'स्त्री लंपट आणि दारुड्या' मनाला लागणारे आणि भिडणारे आहेत. ती पुस्तकं वाचून झाल्यावर मी ती दोन पानं पाठवतो. ते या दोन पुस्तकांवर बंदी आणणार का? हे त्यांनी सांगावं म्हणजे पुढच्या राजकारणावर आपल्याला बोलता येईल, असे जितेंद्र आव्हाड यांनी मिडीयाशी बोलतांना स्पष्ट केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details