Jethalal Apologies : 'जेठालाल'नं विले पार्ले पोलीस ठाण्यात जाऊन मागितली माफी; नेमकं प्रकरण काय, पहा व्हिडिओ - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद
Published : Oct 27, 2023, 7:13 AM IST
मुंबई Jethalal Apologies : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ( tarak ka mehta ulta chashma) या मालिकेत 2016 मध्ये आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं विलेपार्ले पोलीस ठाण्यात जेठालालचं पात्र साकारणाऱ्या अभिनेता दिलीप जोशी यांच्या विरोधात तक्रार पत्र दिलं होतं. यानंतर विलेपार्ले पोलीस ठाण्यात खुद्द अभिनेता दिलीप जोशी यांनी येऊन समस्त आदिवासी समाजाची लेखी पत्र देऊन माफी मागितली. मालिकेत दिलीप जोशी यांनी साकारलेल्या आदिवासी पात्रामुळं समस्त आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्यामुळं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेनं विलेपार्ले पोलीस ठाण्यात अभिनेता दिलीप जोशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी तक्रार दिली होती. मात्र, विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नार्वेकर यांनी मध्यस्थी करत सामोपचारानं हा वादविवादाचा मुद्दा संपुष्टात आणलाय. पोलिसांनी अभिनेता दिलीप जोशी यांना समस्त आदिवासी समाजाची माफी मागण्याची विनंती केली होती. यानंतर अभिनेता दिलीप जोशी यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात येऊन आदिवासी समाजाची माफी मागितली.