महाराष्ट्र

maharashtra

सोमवती यात्रा 2023

ETV Bharat / videos

Jejuri Somvati Amavasya 2023 : जेजुरीत आज सोमवती अमावस्येचा सोहळा! पाहा ड्रोन व्हिडिओ - सोमवती यात्रा 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 9:59 AM IST

जेजुरी (पुणे) Somvati Amavasya : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाची सोमवती यात्रा आज (13 नोव्हेंबर) भरली आहे. खंडोबा गडातून देवाचा पालखी सोहळ्याचं सकाळी सात वाजता प्रस्थान झालं आहे. दुपारी साडेबारा वाजता पवित्र कऱ्हा नदीवर खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्तींना धार्मिक वातावरणात स्नान घालण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यभरातून लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. भंडाऱ्याच्या उधळणीनं संपूर्ण जेजुरी गड न्हाऊन  निघाला असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मागील वर्षी सोमवती यात्रेत खंडोबा गडावर पालखी उतरताना अपघात होऊन सहा जण जखमी झाले होते. त्यामुळं यंदा चेंगराचेंगरी होऊ नये, यासाठी विशेष काळजी म्हणून पालखीला खांदा देणाऱ्या खांदेकर्‍यांना वेगळा ड्रेस कोड देण्यात आला आहे. दरम्यान, मोठ्या उत्साहात आणि 'यळकोट यळकोट जय मल्हार' म्हणत भाविक या यात्रेत सहभागी झाले आहे.  या यात्रेची नयनरम्य दृश्य ड्रोनच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details