Jayant Patil Criticized लोकांच्या भावनांचा गैरवापर करु नका; सरकारने जतला पाणी देण्यासाठी तात्काळ टेंडर जाहीर करावे- जयंत पाटील - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
Jayant Patil Criticized सांगली महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे,असं असताना कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून जत तालुक्यातील गाव कर्नाटक मध्ये येणार,असं विधान करणे म्हणजे न्यायालयाला काही तर दाखवण्यासाठी जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर करण्यासारखं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारकडून जत तालुक्यातल्या 65 गावांना पाणी देण्यासाठी म्हैशाळ विस्तारित योजना ही आखण्यात आली,750 कोटींचा निधी देखील मंजूर केला,तसेच वारणा नदीच्या 6 टीएमसी पाण्याची उपलब्धता देखील करण्यात आली आहे,आता केवळ या योजनेचा टेंडर काढणं बाकी आहे,यामुळे राज्य सरकारने यामध्ये दिरांगाई न करता टेंडर काढावं,आणि कोणत्याही परिस्थितीत जत तालुक्यातील गावे कर्नाटकात जाणार नाहीत,असा विश्वास व्यक्त केला आहे.ते इस्लामपूर मध्ये बोलत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST