महाराष्ट्र

maharashtra

भीक मागो आंदोलन

ETV Bharat / videos

Janshakti Sanghatana : ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; पुण्यातल्या साखर संकुला बाहेर केलं भीक मागो आंदोलन.... - Janshakti Sanghatana

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 2:44 PM IST

पुणेJanshakti Sanghatana : ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम संपून पाच महिने झाले आहेत. आज दुसऱ्या हंगामाची तयारी सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आजतागायत दिग्विजय बागल यांच्याकडे असणारा मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, रणजित शिंदे यांच्याकडे असणारा कमलाई साखर कारखाना करमाळा या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले दिलेली नाहीत. हजारो शेतकऱ्यांवर बोगस कर्ज काढली आहेत. शेकडो वाहन मालकांवर कर्ज काढली आहेत. कामगारांचे पगार थकवले आहेत. तसेच ऐन पावसाळी हंगाम असताना देखील दुष्काळ सदृश परिस्थिती असताना कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत बिले लवकर अदा करावी यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने साखर आयुक्त व सरकारला पत्र देऊन 5 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार जनशक्ती संघटनेच्या वतीने साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन करण्यात आले आहे. तसंच यावेळी साखर आयुक्ताच्या खुर्चीचा लिलाव करून येणारी रक्कम ही साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला पाठवली जाणार आहे. यावेळी शेतकरी आक्रमक होत रस्त्यावरती भीक मागून आंदोलन करत साखर आयुक्तांच्या कारभाराचा निषेध व्यक्त केलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details