महाराष्ट्र

maharashtra

Janmashtami 2023

ETV Bharat / videos

Janmashtami 2023 : जन्माष्टमीपूर्वी अशी सजली 'कृष्णभूमी' मथुरा, पहा मंदिरामधील विशेष सजावट - जन्माष्टमी 2023

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 7:51 AM IST

मथुरा : मथुरेत श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. मंगळवारी रात्री श्रीकृष्ण मंदिर परिसरासह संपूर्ण शहर नववधूप्रमाणे सजलेलं होतं. शहरातील सर्वच चौकांमध्ये विशेष सजावट करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंदिराचं संपूर्ण अंगण रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघालं आहे. लीला मंचसह भागवत भवन आणि मंदिराचं संपूर्ण प्रांगण लेझर लाइट्सनं उजळलं आहे. कृष्ण जयंती साजरी करण्यासाठी दूरदूरवरुन लाखो भाविक मथुरा नगरीत दाखल झाले आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेनं तयारी पूर्ण केली आहे. शहरातील चौकाचौकात, आग्रा दिल्ली हायवे आणि यमुना एक्स्प्रेस वेवरही श्रीकृष्ण जन्माष्टमीचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जन्माष्टमीनिमित्त जिल्हा प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलाय. आग्रा आणि अलिगड झोनमधील पोलीस दलांसह पीएसीच्या अनेक तुकड्या मंदिराजवळ तैनात करण्यात आल्या आहेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details