जम्मूमध्ये मातेकडून बाळाला निर्दयी मारहाण, व्हायरल व्हिडिओ झाल्यानंतर अटक - अप्पर कमिला पुरमंडल व्हिडिओ
श्रीनगर- 23 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमुळे ( 23 second viral video clip ) जम्मूच्या सांबा भागात एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व्हिडिओमध्ये, बाळ तिच्या मांडीवर घेऊन रडायला लागल्यावर चिडलेली महिला बाळाला बेदम ( woman mercilessly toddler ) मारहाण करत आहे. हा व्हिडिओ व्हायरल ( Upper Kamila Purmanda video ) झाला. त्यानंतर लोकांनी महिलेच्या अटकेसाठी सोशल मीडियावर मोहिम राबविली. पोलिसांनी सांगितले की, एका पथकाने कारवाई केली आहे. त्यांनी महिलेला अटक केली. प्रीती शर्मा ( Preeti Sharma viral video ) असे या अटकेतील महिलेचे नाव आहे. तरी अप्पर कमिला पुरमंडल, जिल्हा सांबा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी पुरमंडल पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध एफआयआर दाखल करून तपास सुरू केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी बारी ब्राह्मणा शिवाली कोतवाल यांनी महिलेच्या अटकेची पुष्टी केली, सर्व तपास पूर्ण केल्यानंतर महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या महिलेची मानसिक स्थिती काय होती हे लगेच कळू शकले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:22 PM IST