महाराष्ट्र

maharashtra

जालन्यातील अवैध बायो डिझेल पंपावर छापा

ETV Bharat / videos

DIG Squad Raid On Biodiesel Pump : अवैध बायोडिझेल पंपावर विशेष महानिरीक्षकांच्या पथकाचा छापा, लाखोंचे साहित्य जप्त - जालना जिल्हा पोलीस अधीक्षक

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 10:50 AM IST

Updated : Aug 27, 2023, 11:50 AM IST

जालना :औरंगाबाद परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकानं जालन्यात दोन ठिकाणी अवैध बायोडिझेल पंपावर छापेमारी केली. या छापेमारीतून लाखो रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जालन्यात अवैध बायोडिजलची विक्री होत असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांना मिळाली होती. त्यामुळे या पथकानं शनिवारी रात्री शहरातील औद्योगिक वसाहतीमधील तसेच निधोना रोडवरील अवैध बायोडिजल पंपावार छापा मारून अंदाजे चार हजार लिटर बायोडिजल आणि लाखो रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. गोडाऊनमध्ये छोटासा डिजल पंप तयार करुन त्यामध्ये बायोडिझेल मोजमाप करण्यासाठी यंत्र लावण्यात आलं होतं. या गोडाऊनमधील टाक्या, इन्व्हर्टर, मशिन्स व ईतर साहित्य जप्त करण्यात आलं. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकानं जालना जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस आधीक्षक डॉ. राहूल खाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांना याबाबत माहिती देऊन अंबडचे उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, अंबड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ठूबे, विष्णू चव्हाण, दीपक पाटील, स्वप्निल भिसे, संजय क्षीरसागर, वंदन पवार, संदीप गोतीस, अशोक म्हस्के, अशोक भांगळ आदी अंबड पोलिसांचा सहभाग होता. चंदनझीरा पोलीस निरीक्षक संग्राम सिंह राजपूत, पुरवठा निरीक्षक प्रकाश जाधव, जी एस मोरे, के एन कांबळे, यांच्यासह चंदनझीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी पोहार, पाटील, कांबळे, एएसआय गवई, सय्यद अफसर, एस सी काकरवाल, एस सी देशमुख आदीनं केली.  

Last Updated : Aug 27, 2023, 11:50 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details