MLA Bhaskar Jadhav Jakhadi Dance : भास्कर जाधव नवरात्रीत रममाण, पारंपरिक वेषात जाखडी नृत्याचा लुटला आनंद - In Front of Shardamate During Navratri
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव ( Guhagar Assembly Constituency MLA Bhaskar Jadhav ) यांचे गाव असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबवमध्येही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला ( Special Type of Traditional Jakhadi Dance is Performed ) जातो. शारदादेवीचा हा उत्सव साजरा करताना मंदिरात विशिष्ट प्रकारचे पारंपरिक जाखडी नृत्य केले ( MLA Bhaskar Jadhav Reveling in Traditional Jakhadi ) जाते. आमदार भास्कर जाधव हेही यंदा शारदा देवीच्या दरबारात नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक जाखडी नृत्यामध्ये रममाण झाल्याचे पहायला मिळाले. कमरेला धोतर, त्यावर शेला आणि डोक्यावर पगडी अशा वेशभूषेत सारे ग्रामस्थ नाचतात. त्यात भास्करराव जाधव हेदेखील अगदी लहानपणापासून सहभागी होत आले आहेत. या वर्षीही ते या नवरात्र उत्सवात बेभान होऊन जाखडी नृत्यामध्ये रममाण झाल्याचे पाहायला मिळाले. शारदामातेसमोर भास्कर जाधव यांनी पारंपरिक वेषात सुंदर जाखडी नृत्य केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST