महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video साताऱ्यात कर्नाटकच्या बसवर भगव्या रंगाने लिहिले जय महाराष्ट्र, बोम्मईंविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी, पाहा व्हिडिओ - bus of Karnataka in Satara

By

Published : Nov 26, 2022, 9:52 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

सातारा : सीमा भागातील जत, सोलापूर, अक्कलकोटवर दावा सांगणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबद्दल महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. साताऱ्यात शिवसैनिक आक्रमक झाले असून साताऱ्यातील शिवसैनिकांनी शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या कर्नाटकच्या बसेसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहून आंदोलन केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी कर्नाटक सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. तालुका, जिल्हा सोडाच, पण महाराष्ट्र सरकारची एक इंच जमीन घेऊन दाखवा. मागील वेळी तुम्हाला चांगला धडा शिकवला आहे. बसवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहून आम्ही आमचा इरादा स्पष्ट केला असल्याचा इशारा जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला. यावेळी शिवसेना शहरप्रमुख शिवराज टोणपे, संघटक प्रणव सावंत, युवसेना उप जिल्हाप्रमुख सागर धोत्रे, इम्रान बागवान, सागर रायते अजय सावंत, राम घोरपडे आदी शिवसैनिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करत कर्नाटक सरकारचा निषेध केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details