Video तलवार परत आणा, परंतु इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार.. वडेट्टीवारांचा सवाल - bring back industries of Maharashtra
नागपूर : जगदंबा तलवार Jagadamba sword भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा राज्याचे संस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार Culture Minister Sudhir Mungantiwar यांनी केली आहे. यावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार Former Minister Vijay Wadettiwar यांनी मुनगंटीवारांना चिमटा काढला आहे. तलवारीने राज्यातील युवकांचे रोजगार परत येतील का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार Sword of Chhatrapati Shivaji Maharaj परत आणायचे, निर्णयाचे स्वागत आहे. परंतु शिंदे फडणवीस सरकारच्या काळात इतर राज्यात गेलेले महाराष्ट्रातील उद्योग कोण परत आणणार असा प्रश्न वडेट्टीवार यांनी विचारला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:32 PM IST