Tukaram Beej 2023: देहूत जगतगुरु तुकोबांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा; लाखो वारकरी देहूत दाखल
पुणे: आज जगदगुरू संत श्री तुकाराम महाराज बीजेच्या निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहूत दाखल झाले आहेत. दुपारी बारा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात बीज सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रम आहे. तुकोबारायांचा यंदा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा आहे. या सोहळ्यासाठी एक अप्पर पोलिस आयुक्त, एक पोलिस उपायुक्त, तीन सहायक पोलिस आयुक्त, १९ पोलिस निरीक्षक, २५ सहायक पोलिस निरीक्षक, १३० पोलिस कर्मचारी आहे.
पोलीसांमध्ये वादाचा रंग: देहू संस्थान आणि पोलिसांत वादाचा रंग रंगल्याच पाहायला मिळाला. बिजेदिवशी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या फडणवीसांच्या गृह विभागावर संस्थानने नाराजी व्यक्त केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बिजेदिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करत आहेत. पण त्याच बिजेसाठी पुण्याच्या देहूत दाखल झालेल्या वारकऱ्यांना फडणवीसांच्या गृह विभागाकडून नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे देहू संस्थान आणि पोलीसांमध्ये वादाचा रंग पाहायला मिळत आहे. वारकऱ्यांना देहूच्या वेशीवर रोखले जात आहे. तिथेच जेवणाची व्यवस्था असणारी वाहने ही पार्क करायला लावली जात आहे. मंदिर परिसरातील दुकानं-हॉटेल ही बंद केली आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या गृह विभागाकडून असा जाच सुरू असल्याने देहू विश्वस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात लाखो वारकरी देहूत दाखल झाले. तुकोबाचरणी वेळेत पाऊस पडावा आणि शेतकऱ्याला सुखी व्हावा अशी मागणी घालताना पाहायला मिळत आहेत.