शिर्डी साईबाबा संस्थानला श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण - प्राणप्रतिष्ठापना
Published : Jan 11, 2024, 2:44 PM IST
शिर्डी Ram Mandir Inauguration Invitation :अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या सर्वांनाच लागली आहे. त्यातच हा सोहळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. येत्या 17 जानेवारीपासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार आहे. तसंच 22 जानेवारी रोजी मंदिराचा भव्य असा लोकार्पण सोहळा पार पडेल. या कार्यक्रमासाठी विविध स्तरातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिर्डी साईबाबा संस्थानला देखील निमंत्रण पत्रिका मिळाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रणव पवार यांच्याकडून शिर्डी साईबाबा संस्थानला या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देण्यात आली आहे. ही निमंत्रण पत्रिका साईबाबांच्या समाधीवर ठेवून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.