Raj Thackeray राज ठाकरे यांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही; कलकामच्या पीडित गुंतवणूकदारांचा आक्रोश - Attempt to meet Raj Thackeray
Raj Thackeray चंद्रपूर कलकाम कंपनीत कोट्यावधीची गुंतवणूक करून, फसवणुकीला समोर जाणाऱ्या पीडित गुंतवणूकदारांचा आक्रोश दिसून आला. राज ठाकरे एनडी हॉटेलमध्ये निवासस्थानी ( Accommodation at ND Hotel ) असताना त्यांची भेट घेण्यासाठी हे गुंतवणूकदार गेले असताना त्यांना भेटण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यामुळे या पीडित गुंतवणूकदारांचा आक्रोश हॉटेल समोर बघायला मिळाला. मनसेचे पदाधिकारी भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर आणि सचिन भोयर यांनी न्याय मिळवून देण्याऐवजी कंपनीची बाजू घेतली आणि उलट गुंतवणूकदारांना धमकवत त्यांचे शोषण केले असा त्यांचा आरोप आहे. याच संदर्भात जिल्ह्यातील पीडित गुंतवणूकदारांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न ( Attempt to meet Raj Thackeray ) केला. मात्र त्यांची भेट होऊ देण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे हॉटेल समोरच या गुंतवणूकदारांनी आपला आक्रोश व्यक्त करत राज ठाकरे यांची भेट घेतल्याशिवाय आपण इथून जाणार नाही असा पवित्रा घेतला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST