International Yoga Day 2023 : पुण्यात 5 हजारहून अधिक लोकांच्या उपस्थितीत आंतराष्ट्रीय योग दिन साजरा - महाएनजीओ फेडरेशन
पुणे :आंतराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर, आर्ट ऑफ लिविंग आणि महाएनजीओ फेडरेशनच्यावतीने 5 हजार योग साधक योग साधना यांच्याकडून पुण्यातील एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर योग दिन साजरा करण्यात आला. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत सर्वजण हे आजच्या योग दिनाला सहभागी झाले होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने एसपी कॉलेजच्या मैदानावर हजारो नागरिक योगा करत आहेत. आज अभिमानाची बाब म्हणजे आपल्या भारताचा योगा आज योगा दिनाच्या निमित्ताने जगभर पोहचला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आणि आज सर्वचजण मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करू लागले आहेत, असे मुळीक यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी युगाचे विविध आसन करून आजचा योग दिवस साजरा केला आहे.