महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Uday Samant : बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प सामंजस्याने पुढे नेणार - उद्योग मंत्री उदय सामंत - Union Minister Nitin Gadkari

By

Published : Nov 4, 2022, 2:03 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्प Barsu Solgaon Refinery Project सामंजस्याने पुढे नेणार असून सध्या या रिफायनरी संदर्भात संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत Industries Minister Uday Samant यांनी म्हटलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले, राज्यातील उद्योग वाढीसाठी लवकरच हायड्रोजन पॉलिसी Hydrogen Policy राबवणार असून यासंदर्भात अमेरिकेतील शिष्टमंडळाशी चर्चा झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांचा सुद्धा पाठिंबा आहे. इलेक्ट्रिक बाइक सारखा हायड्रोजन पॉलिसी संदर्भातले प्रकल्प येतील असे सामंत यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रवादी कडून शिंदे फडणवीस सरकार पडणार असे भाकीत केले जात असल्याचा टोला सामंत यांनी यावेळी लगावला. तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिंदे फडणवीस सरकारच्या संपर्कात येऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून विधाने केली जात असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले. संजय शिरसाट नाराज नाहीत, त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचेही सामंत यावेळी म्हणाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details