Army practice : भारतीय आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त हेली बोर्न ऑपरेशन्सचा सराव - हेली बॉर्न ऑपरेशन
उत्तराखंडमधील चमोली सीमावर्ती जिल्ह्यातील औली येथे भारतीय आणि अमेरिकन सैन्याचा संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. दोन्ही देशांचे संयुक्त सैन्य रशियाच्या Mi-17 V5 हेलिकॉप्टरद्वारे युद्ध सराव करत आहेत. युद्धाभ्यासात लष्कर उच्च उंचीच्या भागात हेली बॉर्न ऑपरेशन करणार आहे. उत्तराखंडमधील औली येथे सुरू असलेल्या युद्धाभ्यासात भारतीय लष्कराच्या जवानांनी नि:शस्त्र लढाऊ कौशल्य दाखवले. भारतीय लष्कराच्या जवानांनी युद्धाभ्यासात MI-17 च्या अनेक ऑपरेशन्सचे मॉक ड्रिलही केले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST