महाराष्ट्र

maharashtra

भारतानं विश्वचषक जिंकावं यासाठी पुण्यात विविध ठिकाणी महाआरती

ETV Bharat / videos

क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह! भारतानं विश्वचषक जिंकावं यासाठी पुण्यात विविध ठिकाणी महाआरती - Maha Aarti are held in pune

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2023, 11:39 AM IST

पुणे Cricket World Cup 2023 :आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवार 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आमने-सामने येणार आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष या विश्वचषकाच्या फायनल सामन्याकडे लागलंय.जगभरात या विश्वचषक फायनलसाठी क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं आज सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाची महाआरती करून भारतानं विश्वचषक जिंकला पाहिजे यासाठी बाप्पाच्या चरणी साकडं घालण्यात आलं आहे. भारतानं अंतिम सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरावं, अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. आज पुणे शहरात विविध ठिकाणी महाआरती तसंच दुग्धभिषेक करण्यात येत आहे. तसंच क्रिकेट प्रेमींसाठी ठिकठिकाणी स्क्रीनिंगदेखील करण्यात येत आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details