महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : नाथ सागरात 12 टक्के पाण्याची आवक; जायकवाडी धरण भरण्यासाठी होणार फायदा - Jayakwadi Dam

By

Published : Jul 14, 2022, 2:06 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

पैठण - संपूर्ण मराठवाड्यासाठी वरदान आसलेल्या जायकवाडी धरणात केवळ( 32 ) टक्के असा चिंताजनक पाणीसाठा शिल्लक होता.यंदाही पावसाने मराठवाड्याकडे वाटचाल केली असल्याने जायकवाडी धरणातील सध्याचा उपलब्ध पाणीसाठा काहीसा दिलासा देणारा ठरणार आहे. जुन महिन्यापासून कमी अधीक प्रमाणात पाणलोट क्षेत्रात पैठणच्या जायकवाडी धरणातील येत आसलेली पाण्याची आवक 93 हजार 329 क्युसेकने वाढल्याने आज सकाळी दहाच्या सुमारास या धरणाची पाणी पातळी 45.81% टक्क्यांवर पोहचली असुन सध्या जलाशयात प्रतितास 93 हजार 329 क्युसेक या गतीने पाणी दाखल होत आहे. १५२२ फुट पाणी साठवण क्षमता आसलेल्या जायकवाडी धरणात जुन पासुन पाण्याची आवक सुरू झाली. कमी अधिक गतीने येणाऱ्या या पाण्याने नाथसागर मध्ये या जुन महिन्या त तब्बल 12 टक्के नव्या पाण्याची भर टाकली.सोमवारी संथगतीने सुरू आसलेली पाण्याची आवक मंगळवारी झपाट्याने वाढत गेल्यामुळे नाथसागराला 45.81% टक्क्याचा टप्पा ओलांडण्यास उपयुक्त ठरला आहे. तर जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असून, अशीच पाण्याची आवक राहिल्यास जायकवाडी धरण भरण्यासाठी फारसा अवधी लागणार नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details