Raid In Nagpur: आयकर विभागाचे नागपुरात छापे; बांधकाम, हवाला व्यापारी रडारवर - छापेमारी झाली
नागपूर:आयकर विभागाच्या पथकांनी आज नागपुरात 10 पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईने व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. हवाला आणि बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींवर हे छापे घालण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर यामध्ये हवाला, बांधकाम व्यावसायिकांसह काही व्यापाऱ्यांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या १५० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांनी नागपुरातील दहापेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये रवी अग्रवाल, लाला जैन, शैलेश लखोटिया, इस्रायल सेठ, तन्ना यांची नावे आहेत. ज्यांच्या प्रतिष्ठानांवर छापेमारी झाली आहे. सर्व व्यावसायिक हवाला बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. त्यांच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कर विषयक आर्थिक अनियमितता आढल्याने हे छापे पडल्याची माहिती आहे. छापे कारवाईसाठी मुंबईतील पथक पहाटे नागपुरात पोहोचले होते.