Sharad Pawar : रयत शिक्षण संस्थेने आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिले - शरद पवार
पालघर/मोखाडा :रयत शिक्षण संस्थेने आदिवासी भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या संस्थेच्या विस्तारा ईतका अन्य कुठल्याही शैक्षणिक स्स्थेचा विस्तार नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दुरदृष्टीतुन शैक्षणिक कार्य केले आहे. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला शाहु, फुले , आंबेडकर आणि कर्मविर भाऊराव पाटील यांचे विचार मिळाले. त्यांनीच महाराष्ट्राला दिशा दिली असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यातील मोखाड्यात नुतन ईमारतीचे उदघाटन करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा महाविद्यालयात सुमारे 7 कोटी रूपये खर्चून एक सुसज्ज ईमारत बांधण्यात आली आहे. त्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकुर यांनी 4 कोटी रूपयांची देणगी दिली आहे. या नुतन ईमारतीचे उदघाटन आणि ईमारतीस लोकनेते रामशेठ ठाकुर असे नामकरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
आदिवाशी समाजातील, विद्यार्थ्यांचा शिक्षण घेऊन उद्धार झाला पाहिजे. तसेच फुले, शाहू, आंबेडकर कर्मविरानी देशाला दिशा देण्याचे काम केले आहे.आपण नेहमीच फुलेंचे नाव घेतो. फुले दापंत्यांनी शिक्षणा बरोबरच समाजाला अधुनीकतेचे धडे दिले प्रतिपादन पवार यांनी केले.