Video: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! बस अंगावून जाऊनही वृद्ध सुखरूप - पवईत काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
पवई येथे काळजाचा ठोका चुकवणारा असा अपघात घडला आहे. समोरुन बस आली अन् त्याचवेळी एक वृद्ध रस्ता पार करत होते. ड्राव्हरने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. (Old Man Hit By Bus In Powai) पण, बस पुर्णपणे थांबेपर्यंत बसचा धक्का लागून वृद्ध बसखाली गेले होते. परंतु, म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी', या म्हणीप्रमाणे हे वृद्ध संपुर्ण बस अंगावरून जाऊनही सुखरूप आहेत. त्यांना थोडेसे खरचटले असून गंभीर अशी काही जख झालेली नाही. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST