Vasu Baras काय आहे वसुबारसचं महत्त्व, जाणून घेऊया पंडित वसंतराव गाडगीळ यांच्याकडून - what Pandit Vasantrao Gadgil says
पुणे दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने वसुबारसचं (Vasu Baras) काय महत्त्व आहे, हे आज आपण जाणून घेणार आहोत. दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. याबाबत अधिक माहिती दिली आहे, पंडित वसंतराव गाडगीळ (Pandit Vasantrao Gadgil) यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST