महाराष्ट्र

maharashtra

अक्षय तृतीया 2023

ETV Bharat / videos

Akshaya Tritiya 2023: अक्षय तृतीयेला जप, दान केल्यास मिळते विशेष फलप्राप्ती - महंत अनिकेत देशपांडे - Importance of Akshaya Tritiya 2023

By

Published : Apr 15, 2023, 1:16 PM IST

नाशिक :साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी जप, दानधर्म केल्यास विशेष फलप्राप्ती होते असे हिंदू पुराणात म्हटले आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी सर्वात पवित्र मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयाला विशेष महत्त्व आहे. कल्पाधी, युगाधि अनुसार 22 एप्रिल 2023 रोजी अक्षय तृतीया येत आहे. तसेच या दिवशी भगवान परशुराम जयंती आणि भगवान बसवेश्वर जयंती देखील आहे. अक्षय तृतीयाचा अर्थ कधीही नाश होत नाही असा होतो. या दिवशी केलेले जप, दान, ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते, म्हणून याला अक्षय तृतीया असे म्हणतात. भविष्यपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, विष्णू धर्मोतोपुराण आणि स्कंदपुराण अक्षय तृतीयाचा उल्लेख आढळतो. या दिवशी केलेले शुभ कार्याचे श्रेष्ठफळ मिळते, तसेच देवांचे आणि पितरांचे विशेष पूजन केले जाते. वैशाख महिना हा भगवान विष्णूसाठी अत्यंत आवडता आणि प्रिय महिना आहे. म्हणून या दिवशी विशेषतः विष्णू आणि देवीची विशेष पूजा केली जाते. वैशाख शुक्ल पक्षातील तृतीयेच्या दिवशी गंगेत अंघोळ करणारा व्यक्ती सगळ्या पापापासून मुक्त होतो, असे भविष्य पुरानातील मध्यम पर्वात सांगितला आहे. अक्षय तृतीयेला विशेषतः मोदक गुळ आणि कापुराच्या साह्याने जलदान केल्याने विशेष फलप्राप्ती होते,अशा माणसांचे ब्रह्मलोकांत गणना होते अशी मान्यता आहे. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी एक वेळी आहार घेऊन उपास करू शकतात. या दिवशी ऋतू फल म्हणजे आंबा या फळाचे विशेष महत्त्व आहे. याचबरोबर मडके, पंखा, पादत्राणे, छत्री, जवस, गुळ, तांदूळ, वस्त्र आदींचे दान केल्यास विशेष फलप्राप्ती होते असे महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी सांगितला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details