Udayanraje Bhosale : अजितदादांना शुभेच्छा दिल्या का?, पाहा उदयनराजे काय म्हणाले.. - उदयनराजे भोसले अजित पवारांवर
सातारा, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे सख्य सर्वज्ञात आहे. याच अनुषंगाने आता माध्यमांनी त्यांना तुम्ही अजितदादांना शुभेच्छा दिल्या का?, असा प्रश्न विचारला. त्यावर उदयनराजे म्हणाले की, त्यांचा आणि माझा फोन झाला आहे. मी त्यांना फोनवरूनच शुभेच्छा दिल्या. सध्या त्यांची धावपळ सुरू आहे. सर्व विषय मार्गी लागल्यानंतर आपण भेटू आणि चर्चा करू, असे अजितदादांनी मला सांगितल्याचे उदयनराजे म्हणाले. तसेच मी अजितदादांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहे. माझ्या मंत्रिपदाबाबत केवळ अफवा आहेत. मंत्रिपदात मला इंटरेस्ट नाही. जिल्ह्याला आणखी लोकप्रतिनिधीत्व मिळाले तर अजून कामे होतील. पण ते कुणाला द्यायचे किंवा नाही, हे माझ्या हातात नाही. मंत्रिपदासाठी कुणाचे नाव मी का सूचवू, असा प्रतिप्रश्न उदयनराजेंनी माध्यमांना केला.