महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : पावसाने तुंबलेल्या गटारात स्कूटरवरील पत्नीसह पोलीस कर्मचारी बुडाला, आश्चर्यजनकरित्या झाली सुटका - अलीगड नगर निगम न्यूज

By

Published : Jun 20, 2022, 3:47 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

अलिगड : जिल्ह्यात उघड्या नाल्यात पती-पत्नी स्कूटीसह पडले. पाण्यात स्कूटीसह दोघेही पूर्णपणे बुडाले. सुदैवाने या दाम्पत्याचा जीव मात्र वाचला. ही धोकादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटना कुरसी पोलीस स्टेशनच्या किशनपूर तिराहे येथील आहे. जिथे पोलीस डॉक्टरांना पत्नीला दाखवण्यासाठी घेऊन आले होते. परंतु, रस्त्याच्या कडेला केलेल्या खोल खड्ड्यात स्कूटीसह दोघेही नाल्यात पडले. जास्त पाणी साचल्याने दाम्पत्य बुडू लागले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी कसा तरी दोघांचा जीव वाचवला. नाल्यात पडल्याने पती-पत्नी दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस कर्मचारी आणि जखमी पत्नीने महापालिकेवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details