Python Swallow Goat : अजगराने बोकडाला गिळण्याचा केला पुरेपूर प्रयत्न, पण आले अपयश; पहा व्हिडिओ - अजगराने शेळीला गिळले
दक्षिण कन्नड, कर्नाटक - कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील अत्तूर गावात एका भल्यामोठ्या अजगराने सुमारे तासभर एका बोकडाला गिळण्याचा प्रयत्न केला. मात्र तो त्यात यशस्वी झाला नाही. त्यानंतर त्या अजगराने त्या बोकडाला तसेच सोडून दिले आणि तिथून निघून गेला. मंगळवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली. येथील जॉर्जकुट्टी नावाच्या स्थानिकाच्या सुमारे 45 किलो वजनाच्या बोकडाला अजगराने पकडले. अजगराच्या हल्ल्यात त्या बोकडाचा गुदमरून मृत्यू झाला. त्यानंतर तो अजगर त्याला खाण्याचा प्रयत्न करू लागला. अजगराने बोकडाच्या डोक्याचा काही भाग गिळला, पण तो बाकीचा बोकड गिळू शकला नाही. त्यानंतर तो मृत बोकडाला जागेवरच सोडून जंगलात निघून गेला. आता या अजगराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.