ठाण्यात श्रीराम पेढा आणि श्रीराम लाडूची प्रचंड क्रेज, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित ठाणेकरांना विशेष भेट
Published : Jan 18, 2024, 11:03 PM IST
ठाणे Shriram Pedha:संपूर्ण देशात सध्या रामभक्तीची लाट पसरली असून २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत पार पडणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना 'याची देही याची डोळा' पाहायला मिळणार म्हणून सर्व रामभक्त उत्साहित झाले आहेत. (ShriRam Ladu) प्रत्येक राजकीय पक्ष आणि हिंदू संघटना आपापल्या परीने विविध कार्यक्रमातून प्रभू श्रीरामा विषयीच्या आस्थेचे दर्शन घडवत असताना ठाण्यातील प्रशांत कॉर्नर देखील एक विशेष भेट घेऊन आले आहे. (Ram Mandir Inauguration) प्रत्येक सणाच्या निमित्तानं काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण मिठाचे प्रकार घेऊन येण्यासाठी ठाण्यातील प्रशांत कॉर्नर (Prashant Corner) प्रसिद्ध आहे. येथील मिठाया घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात. याच प्रशांत कॉर्नरने आता राम भक्तांसाठी श्रीराम पेढा आणि श्रीराम लाडू नावानं नवीन मिठाया विक्रीसाठी आणल्या आहेत.
राम भक्तांचे तोंड गोड करण्यासाठी विशेष मिठाई:साजूक तुपातल्या आणि सर्वोत्तम जिन्नस वापरून या मिठाई तयार केल्या गेल्या आहेत. त्यांची विक्री केवळ २१ आणि २२ जानेवारी दिवशीच होणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्कंठा निर्माण झाली आहे. २२ जानेवारी या पवित्र दिवशी देशातील संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार असल्यानं राम भक्तांचं तोंड गोड करण्यासाठी आपण या विशेष मिठाया विक्रीसाठी आणल्याचं प्रशांत कॉर्नर व्यवस्थापनाने सांगितलं.