महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

विद्यार्थ्याने दाखविली जिद्द, अपघात झाल्यानंतर स्ट्रेचरवर झोपून दिली बारावीची परीक्षा - पलायमकोट्टई सरकारी रुग्णालय

By

Published : May 18, 2022, 9:13 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

तिरुनेलवेली ( तिरुवनंतपुरम ) - आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असलेल्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थी खूप मेहनत घेतात. अनेक अडचणीवर मात करतात परीक्षेला बसतात. पण, परीक्षेपूर्वी अपघात झाल्यानंतर...हीच जिद्दीची कहाणी आहे. अझरुद्दीन हा तिरुनवेलीच्या पेट्टाई येथील रहिवाशी ( Azharuddin given exam in stretcher ) आहे. तो कामराजर उच्च माध्यमिक शाळेत बारावीत ( Kamarajar Higher secondary School ) शिकत आहे. सध्या तो बारावीची परीक्षा देत आहे. दुर्दैवाने अपघात झाल्याने त्याला पलायमकोट्टई सरकारी रुग्णालयात ( Palayamkottai government hospital ) दाखल करण्यात आले. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. आज त्याची गणिताची परीक्षा आहे. पायावर पट्टी बांधून परीक्षा लिहिण्यासाठी तो रुग्णवाहिकेतून परीक्षा हॉलमध्ये आला. शिक्षकांच्या मदतीने त्याने स्ट्रेचरमध्ये झोपून परीक्षा ( Student writes Exam in stretcher ) लिहिली. परीक्षा देतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details