Navratri 2022 नवरात्रोत्सवात घटस्थापना कशी करावी, देवीची पूजा कशा पद्धतीने करतात? पाहा हा व्हिडिओ
नाशिक ऑक्टोबर महिन्यातील नवरात्र उत्सवाला Today Started Navratri festival 2022 आजपासून सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात दुर्गा देवीच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू होती. आज घरोघरी घटस्थापना Today Ghatstashana is Done From House to House केली जाते. घटस्थापना करताना देवीची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावी. Lets know How Goddess is Worshipped यानंतर मातीवर कलश ठेवावा. फुले, अक्षता आणि गंगाजल घेऊन वरुण देवतेचे आवाहन करावे. कलशात सर्वोषधी आणि पंचरत्न ठेवावे. कलशाखाली असलेल्या मातीत सप्तधान्य तीळ, जव, तांदूळ, मूग, बाजरी आणि सप्तमृतिका मिसळावे. आंब्याची पाने कलशात ठेवावीत. कलशावर एका पात्रात धान्य भरून त्यावर एक दीप प्रज्ज्वलित करावा. यानंतर कलशावर लाल रंगाचे वस्त्र लपेटून नारळ ठेवावा. त्यानंतर कलशाखाली असलेल्या मातीत जव पसरावे. यानंतर देवीचे ध्यान करावे तिची मनोभावे पूजा, आरती करावी, दुर्गा सप्तशती पठण करावी. देवीच्या घटाजवळील दिवा नऊ दिवस प्रज्वलित ठेवावा.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST