महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत होळी साजरी

ETV Bharat / videos

Holi Celebration In Mumbai 2023 : मुंबईमध्ये विविध ठिकाणी आज धुळवड साजरी करण्यात आली - रंगपंचमी

By

Published : Mar 7, 2023, 3:30 PM IST

Updated : Mar 7, 2023, 4:39 PM IST

मुंबई : आज होळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुलिवंदनानिमित्त मुंबई शहरात विविध ठिकाणी रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अनेक ठिकाणी नागरिक एकमेकांना रंग आणि अबीर लावून होळीचा सण साजरा करत असल्याचे दिसून आले. मुंबईतील जुहू चौपाटीवर आज सकाळपासूनच लोकांची गर्दी झाली होती. सगळे मित्र-मैत्रिणी एकमेकांवर गुलाल उधळतांना दिसून आले. तसेच मुंबईच्या बोरिवली कोरा केंद्राच्या मैदानावर होळीचा जल्लोष साजरा करण्यात आला. तिथे लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. डिजेच्या तालावर ठेका धरत आणि गुलाल, रंग उधळत तरुणांनी होळी साजरी केली. भाजप नेते आणि अभिनेते मनोज तिवारी यांनी होळीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन; आपल्या शैलीत लोकांना शुभेच्छा दिल्या. आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात होळीचा सण साजरा होत असतांना, सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले. 

Last Updated : Mar 7, 2023, 4:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details