महाराष्ट्र

maharashtra

होळीचे दहन

ETV Bharat / videos

VIDEO साईबाबा मंदिरातही होळीचे दहन, शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी साईंना प्रार्थना - होळीचे पुजन

By

Published : Mar 6, 2023, 2:32 PM IST

शिर्डी ( अहमदनगर ) :शिर्डी साईबाबांच्या गुरूस्थान मंदिरासमोर पारंपारिक पद्धतीने होळीचे पुजन करून होळीचे दहन करण्यात आले. तसेच पालथ्या हाताने शंखध्वनी करत मनातील अनिष्ठ प्रवृत्ती शांत होवो अशी प्रार्थना साईबाबा संस्थान आणि भक्तांनी साईबाबांच्या चरणी केली. होळीचा सण हा संपुर्ण भारतभर साजरा केला जातो. साई मंदिराजवळ गुरूस्थान समोर एरंड, फुलांची माळ,ऊस आणि पाच गौऱ्या मध्ये उभा करून होळीला तयार करण्यात आले. मध्यान्ह आरतीच्या आधी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते सहपत्नीक होळीचे पुजन करून दहन केले गेले. मनातील दूष्ट प्रवृत्ती नष्ट होण्यासाठी उत्सव साजरा केला जातोय. साईबाबांच्या मुर्तीला साखरीपासून तयार केलली गाठ घालण्यात आली आहे. देशातील शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी भाविकांनी यानिमिताने साईबाबांना प्रार्थना केली. 

ABOUT THE AUTHOR

...view details