Sangli अफजल खानाच्या वधाचा पोस्टर झळकवत हिंदुत्ववादी संघटनांनी साजरा केला जल्लोष - हिंदुत्ववादी संघटनांचे नेते
सांगली प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर सांगलीत समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला आहे. यावेळी अफजल खान वधाचे फलक ही फडकावत फटाक्यांची आतिशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. सांगली शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे नेते, कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन एकमेकांना साखर- पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे. तर अफजलखानाची कबर उद्धवस्त केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचे केलेल्या वधाचे पोस्टर तब्बल 13 वर्षांनंतर झळकण्यात आले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST