Abu Azmi on Love Jihad हिंदू मुस्लिम का साथ छूट जायेगा, तो हिंदुस्तान तूट जायेगा -अबू आझमी - लव जिहादवर भाजपचे मत
मुंबई लव्ह जिहादची वक्तव्ये भाजपकडून BJP Opinion on Love Jihad केली जात आहेत. मात्र असे काही नाही. जिहाद या शब्दाचा त्यांनी अर्थ समजून घेण्याची गरज आहे. हिंदू मुस्लिम का साथ छूट जायेगा तो हिंदुस्तान तूट जायेगा, Hindu Muslim Saath will be loosed अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे आमदार व महाराष्ट्र अध्यक्ष अबू आझमी SP Leader Abu Azmi यांनी दिली आहे. हिंदू संघटनांकडून मुस्लिम मुलींशी लग्न करणाऱ्यांना पैसे दिले जातात, हा कोणता लव्ह जिहाद आहे असा प्रश्न आझमी यांनी उपस्थित केला आहे. नितेश राणे यांनी लव्ह जिहादबाबत कायदा करण्याची मागणी Demand for Law on Love Jihad केली आहे. याबाबत राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. यावर अबू आझमी बोलत होते. यावेळी बोलताना, लव जिहादसारखे काही नाही. जिहाद बाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पुस्तके आणून देतो. त्यांनी जिहादचा अर्थ काय आहे ते वाचावे. जिहादसारख्या चांगल्या शब्दाला हे लोक लव्ह जिहाद बोलत आहेत. १८ वर्षांवरील मुले मुली लग्न करू शकतात. भारतात कोणतीही मुस्लिम संघटना अशी नाही की हिंदू मुलीशी लग्न करून तिला मुसलमान बनवा, असे सांगते. मात्र यांच्या संस्था बहु लाओ बेटी बचाव Bahu Lao Beti Bhacho या नुसार मुस्लिम धर्मीय मुलींशी लग्न केल्यावर त्या मुलाला २ लाख रुपये देत आहेत. हा कोणता लव्ह जिहाद आहे. हे प्रकार बंद व्हायला पाहिजेत अशी मागणी आबू आझमी Abu Azmi on Love Jihad यांनी केली.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST