Cyclone Biperjoy: मुंबईच्या समुद्रातून उसळू लागल्या उंच लाटा; सर्व चौपाट्यांवर सुरक्षा रक्षक तैनात - समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा रक्षक तैनात
मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने जात असून दुपारी 4 ते 8 या वेळेत कच्छ आणि सौराष्ट्रच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचा लँडफॉल कराची आणि मांडवी दरम्यान होणार आहे. दरम्यान बिपरजॉय या चक्रीवादळाचा परिणाम मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर झाला असून मुबंईतील समुद्र खवळला आहे. समुद्राच्या उंच उडताना दिसत आहेत. या चक्रीवादळामुळे मुंबई शहरासह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईला 145 किमी लांबीचा किनारा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेडून समुद्रकिनारी 120 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात आली आहेत. गिरगाव आणि दादर समुद्रकिनाऱ्यावर सकाळी 8 ते 4 या वेळेत सुरक्षा रक्षक तैनात आहेत. खबरदारी म्हणून मुंबईच्या सर्व चौपाट्या आणि सी-फेस परिसर बंद करण्यात आला आहे.