Bokad Bali सप्तशृंगी गडावरील बोकड बळी निर्णयाला विरोध - Bokad Bali Ritual Citizen opposition
नाशिक सप्तशृंगी गडावर Saptashrungi Nashik बोकड बळीला न्यायालयाने परवानगी दिली High Court Lifted Ban On Bokad Bali Ritual आहे. मात्र कोर्ट हे संरक्षण व कल्याणकारी निर्णय घेण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. पण जर का कोर्ट चुकीचा किंवा समाजघातक निर्णय घेत असेल; तर त्याचा आपण सर्वांनी सुजाण नागरिक म्हणून विरोध करायला Citizen opposition हवं, असं मत व्यक्त करीत महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी बोकड बळीच्या निर्णयाचा विरोध केला आहे. सप्तशृंगी गडावर दसऱ्याला बोकडबळी देण्याची प्रथा अनेक वर्षांपासून आहे. आदिवासी बांधवाच्या सानिध्यात श्री सप्तशृंगी मातेचे स्थान असल्याने ते हा विधी करत असतात. या विधीला शेकडो भाविक उपस्थित असतात,यामध्ये भाविकांची श्रद्धा असल्याने बोकड बळी दिला नाहीतर, गडावर आपत्ती कोसळत असते असा भाविकांचा समज आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST