Hasan Mushrif News: हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा - Hasan Mushrif
मुंबई: पोलीसांवर गंभीर ताशेरे ओढत महाराष्ट्र पोलिसांना खडसावत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत हसन मुश्रीफ यांना दिलासा दिलेला आहे. तसेच त्यांच्या संदर्भात कोणतेही चार्जशीट फाईल केले जाणार नाही. याबद्दलचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने नुकतेच दिले आहे. पुण्याच्या जिल्हा न्यायाधीशांना जी कोर्टाची प्रत मिळत नाही. ती प्रत 25 फेब्रुवारी रोजी किरीट सोमय्या यांच्या ट्विटर अकाउंटवर कशी? मुश्रीफ यांच्या संदर्भातील दहा वर्षांपूर्वीची महत्त्वाची जुनी केस असताना दहा वर्षानंतर त्याची एफआयआर होते आणि ती देखील 16 मिनिटांमध्ये आणि एफआयआरची प्रत लीक होते. ती फक्त किरीट सोमय्या यांच्या अकाउंटला कशी काय जाते. याबाबतचा गंभीर प्रश्न न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी सरकारी पक्षाच्या वकिलांना आणि पोलीसांना केला आहे.