महाराष्ट्र

maharashtra

उत्तराखंडमध्ये पर्यटकांची कार वाहून गेली

ETV Bharat / videos

Car Drowned In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये जलप्रलय!, पर्यटकांची कार गेली वाहून ; पहा व्हिडिओ - car drowned video

By

Published : Jul 7, 2023, 6:01 PM IST

हल्दवानी - उत्तराखंडमध्ये गेल्या 24 तासांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अनेक ठिकाणी भूस्खलन आणि पाणी साचल्याचेही वृत्त आहे. आता लखनऊच्या पर्यटकांची एक कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. गाडीतील प्रवाशांनी वेळीच उडी मारून त्यांचे प्राण वाचवले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. हे पर्यटक नैनितालच्या दिशेने जात असताना त्यांनी गाडीने नाला ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची कार नाल्यात अडकली आणि पर्यटकांमध्ये एकच खळबळ उडाली. घाईघाईत स्थानिक लोकांनी पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर कार पाण्यात वाहून गेली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून कार नाल्यातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी यासंदर्भात सांगितले आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details