महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 4, 2022, 10:50 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ETV Bharat / videos

Heavy Rain In Mumbai : मुंबईत मुसळधार पाऊस सुरू; अनेक सखल भागात साचले पाणी

मुंबई - शहराला 5 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने रात्री मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मुंबईत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस (Heavy rain in Mumbai ) सुरू आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले मात्र, हलक्या पावसाने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत २९ जूनपासून पावसाचा जोर वाढला आहे. २ जुलैपर्यंत पाऊस सतत पडत होता. रविवारी पावसाने विश्रांती घेतली. काल, सोमवार, 4 जुलै रोजी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी पावसाचा जोर वाढला. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला त्यामुळे दहिसर, बोरिवली, कांदिवली, गोरेगाव ,जोगेश्वरी सांगा, वांद्रे, दादर, किंग सर्कलसारख्या इतर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. तर अनेक सखल भागात पाणी ( Stagnant water in low-lying areas in Mumbai ) साचले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details