Heavy Rain In Buldana : तेलखेड गावातील शेतकऱ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडिओ व्हायरल - Water in many houses of Bawanbir village
बुलडाणा :जिल्ह्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. मलकापूर तालुक्यातील तेलखेड येथे पुरामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेले चार तरुण शेतकरी पुराच्या पाण्यात अडकून पडले होते. तेलखेड गावातील ओढ्याला पूर आल्याने त्यांना जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून दोरीच्या सह्याने बाहेर पडावे लागले. या शेतकऱ्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आला असून, नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरले असून बावनबीर ते टुणकी गावाचा संपर्क तुटला आहे. संग्रामपूर तालुक्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू असून केदार नदीला पूर आला आहे. बावनबीर गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गावाला पूर आला असून गावाला नदीसारखे स्वरूप आले आहे.