Heavy rain in Vasai-Virar : वसई विरारमध्ये मुसळधार; शाळांना सुट्टी, वाहतूक ठप्प, रस्ते पाण्याखाली - वाहतूक विस्कळीत
वसई - विरारमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे ( Heavy rain in Vasai Virar )शहरातील मुख्य रस्त्यांना नदीचे स्वरूप ( Roads look like rivers )आले आहे. रस्ते वाहतूकही विस्कळीत ( Road Transportation disrupt ) झाली आहे. सखल भागांत पाणी साचलेले ( roads flooded ) पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लागतो आहे.विवा कॉलेजजवळचा परिसर, तिरुपती नगर, बोळींज-जकात नाका नेहमीप्रमाणेच रस्ते पाण्याखाली गेले आहेत. ठिकठिकाणी सेक्शन पंप लावूनही त्याचा वापर होत नाहीये वसई विरार मधील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली ( Schools were closed ) आहे.. साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प आहेत, शिवाय पावसाचा जोरही कायम असल्याने सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. विरार पश्चिमेच्या सेंट झेवीअर्स शाळेला तर चारही बाजूने पाण्याने वेढा घातला आहे. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विपुल पाटील यांनी.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST