अवकाळीने कांदा पिकाचे नुकसान; पीक उपटून टाकण्याची शेतकऱ्यावर आली वेळ - शेतकरी उल्हास वाकळे
Published : Dec 10, 2023, 7:44 PM IST
संगमनेर (अहमदनगर)Onion Crop: अवकाळी पावसासह (Unseasonal Rain In Sangamner) धुक्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने उभे पीक काढून टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अक्षरक्षः डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील कोठे बुद्रुक येथील शेतकरी उल्हास वाकळे यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी पावणेदोन एकर क्षेत्रात कांदे लागवड केली होती. मशागत, रोप, खते, औषधे असा ऐंशी ते पंचाऐंशी हजारांहून अधिक खर्च त्यांनी केला होता. त्यानंतर पीक आलेही जोमदार. मात्र अवकाळी पावसाने पिके झोडपून काढली. त्यानंतर सतत पडत असलेले धुके तसंच ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात पिवळी पडू लागली. त्यामुळे कांदा उपटून टाकणयाची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मायबाप सरकारने यांचा गांभीर्याने विचार करुन शेतीचे पंचनामे करावेत. तसेच शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी, शेतकरी उल्हास वाकळे यांनी केलीय.