Hawkers Attack In Thane : अतिक्रमण विरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला; दगडफेकीत वाहनांचं नुकसान, फेरीवाल्यांचं ठिय्या आंदोलन - सहायक आयुक्त महेंद्र भोईर
Published : Oct 11, 2023, 7:28 AM IST
ठाणे Hawkers Attack In Thane :महापालिकेच्या हद्दीतील वागळे इस्टेट इथं अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी गेलेल्या ठाणे महापालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला केला. फेरीवाल्यांनी मंगळवारी संध्याकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेतील वाहनांवर केलेल्या दगडफेक महापालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. यात दोन वाहनांचं नुकसान झालं. वागळे इस्टेट परिसरातील रोड नं 16 या ठिकाणी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई सुरु होती. कारवाई झाल्यानंतर अतिक्रमण विभागाची वाहनं निघाली असताना फेरीवाल्यांकडून अचानक मोठ्या गाडीच्या काचेवर दगड मारण्यात आला. ठाण्यात फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न वागळे परिसरात घडलेल्या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहायक आयुक्त महेंद्र भोईर यांनी यासंदर्भात वागळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेनं काढलेल्या व्हिडिओच्या आधारे पालिकेनं ही कारवाई केल्याचा आरोप फेरीवाल्यांकडून करण्यात आला आहे. याठिकाणी बसण्यासाठी आमच्याकडून पावती फाडली जाते. मात्र, पालिकेकडून कोणत्याही प्रकारची सूचना न देता कारवाई करण्यात आली असल्याचं यावेळी फेरीवाल्यांनी सांगितलं.