Monks Opposition To Same-Sex Marriage : समलिंगी विवाहाला साधू-मुनींचा विरोध, पंतप्रधानांची घेणार भेट - Monks Opposition To Same Sex Marriage
हरिद्वार (उत्तराखंड) :सध्या समलिंगी विवाहावर कायदा बनवण्याबाबत आंदोलने सुरू आहेत. हरिद्वारचे साधू-मुनीही समलिंगी विवाहाला कडाडून विरोध करत आहेत. आज रविवार (दि. 30 एप्रिल)रोजी हरिद्वार येथे झालेल्या संत संमेलनात आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि महानिर्वाणी आखाड्याचे सचिव महंत रवींद्रपुरी यांनी समलिंगी विवाह कायदा लागू करण्यास विरोध केला आहे. अशा प्रकारचा कायदा देशात होऊ नये, असे ते म्हणाले. त्याचवेळी, समलिंगी विवाह कायद्याच्या निषेधार्थ त्यांनी 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे यावेळी माध्यामांशी बोलताना सांगितले आहे. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरी म्हणाले की, भारतातील विवाह ही प्राचीन परंपरा आहे. पाणिग्रहण संस्कार नावाच्या विवाह पद्धतीचा शास्त्रात उल्लेख आहे. परंतु, आजकाल काही निवडक लोक समलिंगी विवाहाची मागणी करत आहेत. समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याला साधू समाजाचा जोरदार विरोध होत आहे.