महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Har Har Mahadev movie : पुण्यात मनसैनिकांनी पुन्हा सुरू केला हर हर महादेव चित्रपटाचा शो..

By

Published : Nov 9, 2022, 4:43 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

पुणे : गेल्या काही दिवसांपासून हर हर महादेव चित्रपटावरून ( Har Har Mahadev movie ) सुरू असलेला वाद हा चिघळत चालला आहे. पुण्यात संभाजी ब्रिगेडच्या वतीने हर हर महादेव हा शो बंद करण्यात आला होता. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुण्यात बंद केलेले हर हर महादेव चित्रपटाचे शो आजपासून सुरू करण्यात आले आहेत. पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राइड थेटर मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी एकत्र येत हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरू केला आणि यावेळी कार्यकर्त्यांनी थेटर मध्ये चित्रपट पाहता पाहता जोरदार घोषणाबाजी केली. हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे ( Raj Thackeray ) यांना विरोध करण्यासाठी जर कोणी चित्रपट बंद करण्याचा प्रयत्न करणार असेल तर यापुढे खळखट्याक होणार असा इशारा यावेळी मनसैनिकांनी दिला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details