Hanuman Jayanti 2023: 105 फूट उंच हनुमान मूर्तीला चढवला रिमोटद्वारे दीड क्विंटल फुलांचा हार.. - दीड क्विंटल फुलांचा हार
बुलडाणा: देशात हनुमान जयंती निमित्त मोठ्या प्रमाणात साजरी केल्या जात आहे. राज्यातील हनुमान मंदिरामध्ये भक्तीमय वातावरण पसरले आहे. कोट्यवधी हनुमान भक्त या जयंती कार्यक्रमाचा आनंद घेत आहे. अनेक ठिकाणी सामूहिक हनुमान चालीसा, रामरक्षा पठण, सामूहिक आरती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिलांनी आणि पुरुषांनी अनेक आध्यात्मिक कार्यक्रमात भाग घेत आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक देखील सहभागी झाले आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात सन 2000 मध्ये 105 फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. मुंबई नागपूर महामार्ग क्रमांक सहावर ही मूर्ती बसलेली आहे. 2003 मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली. गेल्या 24 वर्षांपासून या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबविले जातात. हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर तब्बल पाच क्विंटल वजनाचा फुलांचा हार चढविण्यात येत असतो. यंदा हाच हार दिड क्विंटलचा चढवण्यात आला आहे. गेल्या अडीच वर्षात कोरोनामुळे जयंती उत्साहावर कोरोनाचं निर्बंधांचं सावट होते. त्यामुळे जिल्ह्यात हनुमान जयंतीचा उत्सव थाटामाटात साजरा होताना पाहायला मिळत आहे. अंजनी पुत्र हनुमान याचा चैत्र शुद्ध पोर्णिमाला जन्म सोहळा साजरा केला जातो. आज संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हनुमान मंदिरात जन्म सोहळ्यानिमित्य विविध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळीच भक्तगणाची हनुमान मंदिरात दर्शनसाठी रीघ लागली होती. अभिषेकाचे कार्यक्रम सुद्धा हनुमान मंदिरात पार पडले. हनुमान जयंती मंदिरही सजविण्यात आली होते. ठीक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.