महाराष्ट्र

maharashtra

कोला जिल्ह्यात गारपीट

ETV Bharat / videos

Hailstorm In Akola District अकोला जिल्ह्यात गारपिटीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान - गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान

By

Published : Mar 18, 2023, 2:59 PM IST

अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज दर्शविला आहे. बार्शीटाकळी आणि पातुर या तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसासोबतच जोरदार वारा आणि गारांचा पाऊस पडला आहे. यामुळे या भागात बागायतदार शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन दिवसांपूर्वी अकोट, तेल्हारा या परिसरामध्ये किरकोळ पाऊस पडला होता. पातुर आणि बार्शीटाकळी या तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार गारपीट झाली. या गारपिटीमुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. शेतामध्ये पूर्णपणे गारांचा पाऊस पडला होता. या गारांमुळे डाळिंब, लिंबू, संत्रा या आदि फळबागांचे नुकसान झाले आहे. नुकतीच लागवड केलेल्या या फळबागांमध्ये गारपिटीने येथील छोटी रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तसेच पातुर तालुक्यातील कोठारी बु., कोठारी खु., आष्टुल, पाष्टुल, येथील शेतकऱ्यांचे अंदाजे 80 टक्के हरबरा, गहु, कांदा, संतरा, लिंबू आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. या गारा खूप मोठ्या असल्याने अनेकांच्या घरावरील छतांना छिद्रे पडली. या गारांमुळे अजूनपर्यंत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details