Guru Purnima In Shirdi: शिर्डी साईमंदिरात दहीहंडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता - मंदिरात महारुद्राभिषेक
अहमदनगर : शिर्डी साईमंदिरात काल्याच्या किर्तनानंतर दहिहांडी फोडून गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता करण्यात आली. तीन दिवस शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. रात्री मंदिर दर्शनासाठी खुले असल्याने काकड आरती करण्यात आली नाही. आज शेवटचा तिसरा दिवस असल्याने सकाळी साई मुर्ती आणि समाधीला मंगलस्नान घालण्यात आले. त्यानंतर साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सपत्नीक गुरूस्थान मंदिरात महारुद्राभिषेक करण्यात आला. गुरुपौर्णिमा उत्सवाचा सांगता दिवस असल्याने आज साईमंदिरात काल्याचे किर्तन पार पडले. काल्याच्या किर्तनासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि साई भक्त उपस्थित होते. झीम्मा, फुगडी खेळुन भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. किर्तनानंतर दहिहांडी फोडून दुपारची मध्यान्ह आरती करून उत्सव समाप्त झाला. तसेच या तीन दिवसात 3 लाख भाविक साईचरणी नतमस्तक झाले होते.