महाराष्ट्र

maharashtra

साईबाबांचे मंदिर आज रात्रभर खुले

ETV Bharat / videos

Gurupurnima festival at Shirdi : साईबाबांचे मंदिर आज रात्रभर खुले; गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात - साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक

By

Published : Jul 3, 2023, 12:16 PM IST

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीमध्ये तीन दिवस चालणाऱ्या गुरुपौर्णिमा उत्सवाची आज मोठ्या धूम धडाक्यात सुरुवात झाली आहे. साईबाबाना आपले गुरु मानणारे लाखो भक्त आज शिर्डीमध्ये साई समाधीचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहे. साईबाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आज स्वत:ला धन्य मानत आहे. गुरुपौर्णिमाला व्यास पौर्णिमा असेही म्हणले जाते. सन १९०८ साली साईबाबाच्या अनुमतिने या गुरुपौर्णिमा उत्सवला सुरुवात झाली. साईबाबाचे परमभक्त तात्यासाहेब नूलकर, तात्या कोते पाटील आणि काही भक्तांनी व्यास पौर्णिमेच्या दिवशी साईबाबांना आपले गुरु मानून पूजा केली. त्यावेळी पासून शिर्डीमध्ये व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा या उत्सवला सुरुवात झाली. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासुन साईंची प्रतीमा, विणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या व्दारकामाई पर्यंत नेण्यात आली. व्दारकामाईत अखंड पारायणाच वाचन करुन मिरवणूक गुरूस्थान मंदिराच्या मार्ग समाधी मंदिरात आणण्यात आली. आजच्या गुरुपोर्णिमा उत्सवच्या मुख्य दिवसाची सुरुवात झाली. साईबाबाच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कान्या कोपऱ्यातुन आज लाखो भक्त आले असून पूणे, मुंबई, नासिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. आज गुरुपौर्णिमाचा मुख्य दिवस असल्याने आज रात्रभर साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details