Video : आताच कसे पायाला भिंगरी लावली तसे फिरतात? गुलाबराव पाटलांची आदित्य ठाकरेंवर टीका - Jalgaon Breaking News
शिवसेना माजी मंत्री गुलाबराव पाटील ( Former Minister Gulabrao Patil ) यांनी माध्यमांशी संवाद साधताना युवा नेते आदित्य ठाकरे ( Youth Leaders Aditya Thackeray ) यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे तरुण आहेत, त्यांच्या कार्यातून ते दिसले पाहिजे. आताच का आदित्य साहेब महाराष्ट्रभर भिंगरीसारखे फिरत आहेत? अडीच वर्षांत कधी सेनाभवनाची पायरी ते चढले नाहीत. आता ते पळापळ करीत आहेत. हे त्यांनी अगोदरपासून करायला पाहिजे होते. आमची भूमिका हीच होती की, तुम्ही पक्ष कार्यासाठी महाराष्ट्रभर फिरा. आज 80 वर्षांचे शरद पवार तीन तीन वेळा जळगावला येतात. अजित पवार येतात, धनंजय मुंडे येतात. हे तर तरुण आहेत मग यांना महाराष्ट्रभर फिरायला काय अडचण होती. आमची हीच भूमिका होती की, तुम्ही पक्ष वाचवण्यासाठी शिवसेनेच्या मतदारसंघांमध्ये फिरले पाहिजे. आमच्या काही समस्या असतात, ज्या आम्ही पक्ष प्रमुखाकडे मांडतो. परंतु, जर पक्ष प्रमुखच मुख्यमंत्री झाले असतील, तर आम्ही आमदारांनी, मंत्र्यांनी समस्या मांडायच्या कोणाकडे? असा सवालही गुलाबराव पाटलांनी केला. ग्रामपंचायत सदस्याचे सरपंच ऐकतो, झेडपी सदस्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष ऐकतो, नगरसेवकांचे नगराध्यक्ष ऐकतो तसे आमदारांचे पक्ष प्रमुखाने ऐकले पाहिजे. हाच मुद्दा आहे, माझे व्यक्तिगत कुठलीही समस्या नव्हती, परंतु नवीन आमदारांच्या समस्या होत्या, ज्या आम्ही उद्धव साहेबांना सांगायचा प्रयत्न केला. परंतु, काही त्याचे झाले नाही.
Last Updated : Feb 3, 2023, 8:25 PM IST